राजकारण,निवडणूक

ज्यांच्या विरोधात दंड थोपटले, त्यांनी सूड बुद्धीतून ही कारवाई करण्यास भाग पाडले – अभिजित पाटील

प्रतिनिधी/पंढरपूर

ज्यांच्या विरोधात आपण छत्रपती शिवाजी चौक पंढरपूर येथे दंड थोपटले होते, त्यांना माझी भीती वाटू लागली, माझा विजयाचा वारू रोखण्यासाठी सूड बुद्धीने ही आयकर विभागाची कारवाई करण्यास भाग पाडले असल्याची प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी दिली आहे..

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांना घवघवीत यश मिळाले होते, विजयाच्या सभेत शिवाजी चौक येथे अभिजित पाटलांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात दंड थोपटून त्यांना आव्हान दिले होते.. अभिजित पाटलांवर आयकर विभागाची धाड पडली असल्याच्या बातम्या आल्या पासून हे परीचारकांचेच षडयंत्र असल्याच्या चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरु होत्या.. आज पुन्हा अभिजित पाटलांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे..

अभिजित पाटील पुढे बोलताना म्हणाले कि, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही समाधानकारक उत्तरे दिली आहेत.. आमच्या प्रत्येक व्यवहाराची पडताळणी केल्यानंतर त्यांना कोणतेही अतिरिक्त पैसे किंवा सोने सापडले नाही, त्यांनी आमचे प्रत्येक कागदोपत्री हिशोब तपासले.. काही कागद उपलब्ध नव्हते, त्यासाठी त्यांनी पंधरा दिवसांचा कालावधी दिला आहे.. तेही आम्ही पूर्ण करू..

मात्र अभिजित पाटील यांनी तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच नाव न घेता परिचारकांवर टीकास्त्र सोडल्याने आता पुढच्या काळात अजून कलगीतुरा रंगताना दिसणार.. हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *