क्राईम

धक्कादायक ! आईनेच दिली पोटच्या मुलाला मारण्याची सुपारी…

प्रतिनिधी / धुळे

धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे आईनेच आपल्या पोटच्या मुलालाच जीवानिशी मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. लताबाई विश्वास भामरे असे आईचे नाव असून अमोल विश्वास भामरे ( वय – ३८ ) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे..

अमोल भामरे हा कोणताच कामधंदा करत नव्हता.. तसेच पैशासाठी घरी कुटुंबियांना त्रास द्यायचा.. दररोज घरातील आई – वडील, पत्नी, मुलांशी भांडण करायचा.. त्याच्या या त्रासाला कंटाळून आई लताबाई भामरे यांनी पोटच्या मुलाला कायमचे संपवण्यासाठी पुंडलिक भामरे यांना २५००० हजाराची सुपारी दिली..

ठरल्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास पुंडलिक भामरे यांनी अमोल याला फोन करून मेहेरगाव येथील बस स्टेंड परिसरात बोलावून घेतले.. त्यानंतर इतर दोन जणांना बोलावून पुंडलिक हे नवलाने परिसरातील जी टी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात पार्टी करायला बसले..

संधी मिळताच तिघांनी अमोल याचा वायरने गळा आवळून खून केला.. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी अमोल याचा मृतदेह सापडल्यानंतर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.. या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरवात केली..

त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी पुंडलिक भामरे यांना अटक केली.. पुंडलिक भामरे यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.. त्यानंतर अमोल भामरे आणि पुंडलिक भामरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *