महत्वाच्या घडामोडी

या आईच्या जिद्दीला सलाम, यांचा संघर्ष पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल…

प्रतिनिधी / दिल्ली

आई आपल्या पोटच्या मुलासाठी सगळ्या जगाशी लढायला तयार असते.. म्हणून आपण देवापेक्षा आईला अधिक मानतो.. आईपेक्षा या जगात कोणीही शक्तिशाली नाही हे तितकेच खरे आहे.. असंचं एक दृश्य नोएडाच्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळेल.. या रस्त्यावर एक महिला चक्क आपल्या मुलाला ओढणीत बांधून छातीशी घेऊन ई रिक्षा चालवतांना दिसतं आहे.. चंचल शर्मा (वय – २७ ) असे या महिलेचे नाव आहे..

चंचल ही महिला रोज सकाळी घरातील सगळी कामे आवरून आपल्या एका वर्षाच्या मुलाला छातीशी बांधून ई रिक्षा चालवण्यासाठी तयार असतात.. नोएडातील सेक्टर ६२ नेशनल पासून ते  इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल्सच्या सेक्टर ५९ लेबर चौकापर्यंत या ६.५ किलोमीटरच्या परिसरात चंचल या ई रिक्षा चालवतात.. या परिसरात चंचल या ई रिक्षा चालवणाऱ्या एकमेव महिला आहेत.. इतर महिलांप्रमाणेच चंचल या बेरोजगारीने हतबल झाल्या होत्या.. मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्याने नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना अपयश आले.. शेवटी चंचल यांनी पोटापाण्यासाठी ई रिक्षा घेऊन ती चालवण्याचा निर्णय घेतला..

चंचल म्हणतात की, माझ्या ई रिक्षेत बसणारा प्रत्येकजण माझं कौतुक करत असतो तसेच मोठ्या प्रमाणात महिला माझ्या रिक्षात बसण्यासाठी प्राधान्य देत असतात.. चंचल या एक माता असून त्या त्यांच्या मुलाला कोणाच्याही भरवशावर सोडून जाऊ शकत नाहीत.. म्हणून त्या आपल्या एका वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन ई रिक्षा चालवतात.. त्यांच्या या कार्याचे आणि जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *