क्राईम

पतीशी वाद होताच पत्नीने घेतला टोकाचा निर्णय ! पोटच्या लेकीसोबत केलं असं काही…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.. येथे पती – पत्नीच्या वादातून एका निष्पाप जीवाची हत्या करण्यात आली आहे.. एका महिलेने पतीसोबत झालेल्या वादातून आपल्या पोटच्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे.. दृष्टी असे या दीड वर्षाच्या मुलीचे नाव आहे..

अधिक माहितीनुसार शिवानी असे या महिलेचे नाव आहे.. या महिलेचे पती अंकित कुमार सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत.. पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेले अंकित कुमार हे सुट्टी मिळाल्याने काही दिवसांकरिता घरी आले होते..

अंकित आणि शिवानी यांच्यात सारखे वाद व्हायचे.. अंकित आणि शिवानी या दोघांचेही दुसरे लग्न होते.. शिवानीच्या सासरच्यांनी शिवानीचे अन्य दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आहेत त्यामुळे तिने हे कृत्य केले आहे असा आरोप केला आहे..

पोलिसांच्या चौकशीनंतर शिवानीने सांगितले की, पती अंकित यांना मला घराबाहेर काढायचे होते आणि मुलीला स्वतःजवळ ठेवायचे होते, या कारणावरून आमच्यात वाद सुरु होते.. ‘ ना ती तुझ्याजवळ राहील ना माझ्याजवळ ‘ असं म्हणत मीच माझ्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली शिवानी हिने दिली आहे..

शिवानी हिने आपल्या पहिल्या लग्नातही असेच कृत्य केले होते असे तिच्या सासरच्यांनी पोलिसांना सांगितले आहे.. या अगोदरही तिने आपल्या पाच महिन्याच्या मुलीला मारले होते असे वृत्त समोर आले आहे.. पती अंकित याने आपली पत्नी शिवानी हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे..

आरोपी शिवानी हिला पोलिसांनी अटक केली आहे.. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *