महत्वाच्या घडामोडी

तरुणाने आपल्या मृत प्रेयसीशी केले लग्न ! आयुष्यभर लग्न न करण्याची घेतली शपथ…

प्रतिनिधी / गुवाहाटी

असं म्हणतात की, खरं प्रेम हे नेहमीच अमर असत.. अनेक प्रियकर आणि प्रेयसी खरे प्रेम मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात.. अशीच एक आसाममधून आपलं खरं प्रेम सिद्ध करून दाखवणारी घटना समोर आली आहे..

आसाममध्ये एका प्रियकराने आपल्या मृत प्रेयसीसोबत विवाह केलाय.. आणि यापुढे आयुष्यात कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली आहे.. बिटुपन तामुली ( वय – २७ ) असे या प्रियकराचे नाव आहे आणि प्रार्थना असे मृत झालेल्या प्रेयसीचे नाव आहे..

बिटुपन आणि प्रार्थना हे खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते.. आणि ते लवकरच लग्नही करणार होते.. बिटुपन आणि प्रार्थना यांच्या नात्याबद्दल त्यांच्या घरच्यांनाही माहित होते.. आणि ते या दोघांच्या नात्यापासून खुशही होते.. परंतु नियतीच्या मनात काही वेगळचं होतं..

प्रार्थना ही अनेक दिवसांपासून आजारी होती.. एके दिवशी प्रार्थनाची प्रकृती अचानक खालावली.. त्यामुळे गुवाहाटीच्या एका प्रायवेट हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले.. मात्र प्रार्थनाची प्रकृती जास्तच खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला.. खूप प्रयत्न करूनही डॉक्टरांना तिला वाचवण्यात यश आले नाही..

प्रार्थनाच्या मृत्यूनंतर बिटुपन खूप भावूक झाला, आणि खूप रडला.. मात्र त्याने सर्व नियमांचे पालन केले.. प्रार्थनाच्या मृत्यूनंतरही बिटुपनने तिच्याशी लग्न केले.. आणि आयुष्यात कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली.. बिटुपनचं प्रार्थनाच्याविषयी असलेले प्रेम पाहून कुटुंबाचही मन भरून आलं.. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *