मुंबईत मोठी दुर्घटना, नशिब बलवत्तर म्हणून येथील नागरिक वाचले…
प्रतिनिधी \ मुंबई
मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. बोरिवलीत चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बोरिवलीत साईबाबा नगरमध्ये गीतांजली इमारत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
![](https://www.abmarathi.in/wp-content/uploads/2022/08/Screenshot_20220819-154329_Chrome-1024x694.jpg)
सदर इमारत धोकादायक असल्याचे मनपा कडून सांगण्यात आलं होत. ही इमारत ३५ वर्षे जुनी होती. मनपाच्या सांगण्यावरून इमारतीतील लोकांनी सकाळीच आपली घरे रिकामी केली होती. इमारतीतील लोक सकाळीच इमारतीतून बाहेर पडल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
ही इमारत कोसळतानाची दृश्य मोबाईल कॅमेर्यात कैद झाले असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायलर होत आहे.