लग्नानंतर बायकोने सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याने केलं असं काही…
प्रतिनिधी / बंगळुरू
कर्नाटकातील बंगळुरू येथून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.. येथे एका पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याने नवऱ्याने तिची गळा आवळून हत्या केली आहे आणि मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी शिराडी घाटाच्या दरीत फेकून दिला आणि नंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन बायको बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे..
हा व्यक्ती बिहारचा रहिवासी असून बंगळुरूमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करतो.. या व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते.. लग्नाच्या वेळेस त्याच्या पत्नीने तिच्या वयाबाबत चुकीची माहिती दिली होती.. त्यामुळे तो पत्नीवर नाराज होता..
या व्यक्तीची पत्नीने लग्नाच्या वेळेस पतीच्या नातेवाईकांना तिचे वय २८ असल्याचे सांगितले होते परंतु ती पतीपेक्षा १० वर्षांनी मोठी होती म्हणजेच तिचे वय ३८ होते.. त्यामुळे ती सेक्स करायला कधीच हो म्हणत नसे आणि त्या व्यक्तीला आणि घरच्यांना ती असभ्य म्हणत असे..
पत्नी आपल्याला असभ्य म्हणत शरीर संबंध ठेवण्यास नकार देत असल्याने रागाच्या भरात पतीने तिच्या खुनाचा प्लान केला.. आणि त्यासाठी आपल्या मित्राला बिहारहून बोलावून घेतले.. त्यानंतर पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह दरीत फेकून दिला..
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पतीने बायको बेपत्ता असल्याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात दिली.. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला आहे.. त्यानंतर पोलिसांनी या आरोपी व्यक्तीला अटक केली आहे.. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे..