बापरे ! एका गाडीवर २ कुत्रे, २ कोंबड्या आणि माणसे सात…
प्रतिनिधी / सोलापूर
आपण पाहिले असेल की, काही लोकं खूप भन्नाट असतात.. त्यांना सरकारी नियमांचा काहीच फरक पडत नाही.. अशा व्यक्ती आपल्याला ठिकठीकाणी पाहायला मिळतात.. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे..
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या व्यक्तीने आपल्या गाडीवर घरातील सर्व वस्तू गाडीच्या बाजूला बांधल्या आहेत.. तसेच त्याच्या सोबत कुत्रे, कोंबड्याही आहेत.. त्याचबरोबर नवरा – बायको आणि पाच मुले असे सात जण चालले आहेत..
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती आपल्या दुचाकीवर सगळा संसार तसेच आपल्या कुटुंबातील सात जणांना घेऊन चालला आहे.. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप जणांनी शेअर केला असून, या व्हिडीओला अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत..