महत्वाच्या घडामोडी

९ महिन्याची गरोदर महिला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली अन घडलं असं काही…

प्रतिनिधी / भंडारा

मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी येथे एक मन हेलावणारी घटना घडली आहे.. येथे एका ९ महिन्याची गरोदर असलेल्या महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.. राजकुमारी सुनील नेवारे ( वय – ३० ) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे..

राजकुमारी ही नेहमीप्रमाणे सकाळी गावाजवळील हुटकाळा तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती.. कपडे धुवत असताना अचानक राजकुमारी हिचा पाय घसरला आणि तलावात खोल पाण्यात पडली.. तिने जीव वाचवण्यासाठी आरडओरडा केला, परंतु आजूबाजूला कुणी नसल्यामुळे तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही..

तलावातील पाण्याची पातळी खोल असल्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला आहे.. राजकुमारी हिची सासू शेळ्या चारून घरी आल्यानंतर सून राजकुमारी घरात दिसली नाही.. म्हणून सासूने शेजारी आणि गावात विचारपूस केली तरीही राजकुमारीचा कुठेच पत्ता लागला नाही..

तलावावर कपडे धुण्यासाठी राजकुमारी गेली आहे असे सासूला समजताच तलावावर धाव घेऊन राजकुमारीला शोधण्याचा प्रयत्न केला असता तलावातील पाण्यावर राजकुमारी हिची साडी तरंगताना दिसून आली.. त्यानंतर काय घडले असेल याचा त्यांना अंदाज आला..

गावकऱ्यांच्या मदतीने राजकुमारीला पाण्याबाहेर काढून करडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.. या घटनेची माहिती करडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे..

राजकुमारी हिचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रुग्णालयात पथव्नुअत आला आहे.. राजकुमारी हीचा गरोदर अवस्थेत मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *