महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! वयाच्या ५९ व्या वर्षी महिलेने दिला बाळाला जन्म…

प्रतिनिधी / नातेपुते

वैद्यकीय क्षेत्र हे वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण घडामोडींनी भरलेलं आहे.. यामध्ये तुम्ही जेव्हडे संशोधन कराल तेव्हडे पुढे जाल.. असाच एक प्रकार नातेपुते येथे श्री साई समर्थ हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. साईनाथ भोसले व डॉ. अपर्णा आढाव- भोसले यांच्या बाबतीत घडला आहे..

एक महिला मुल होत नसल्याने डॉ. साईनाथ भोसले यांच्याकडे आली होती, पण तिचे वय ५९ होते.. एव्हडे वय असतानाही वंध्यत्वावर खात्रीशीर उपचार पद्धती शोधणाऱ्या व हजारो कुटुंबांना यशस्वी उपचार करणाऱ्या डॉ. भोसले दाम्पत्यांनी ते शिवधनुष्य पेलले.. त्यांनी त्या महिलेवर उपचार सुरु केले, आणि एक वैद्यकीय आश्चर्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले..

एका ५९ वर्षीय महिलेने एका सुंदर व गोंडस बाळाला जन्म दिला आहे.. डॉ. साईनाथ भोसले हे मुळचे फोंडशिरस येथील रहिवासी असून ते नातेपुते तसेच धर्मपुरी येथे अहोरात्र वैद्यकीय सेवा देतात.. डॉ. साईनाथ भोसले हे खूप कष्टाळू असून प्रामाणिकपणे आपल्या पत्नी डॉ. अपर्णा आढाव- भोसले यांच्यासोबत नातेपुते येथे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात.. डॉ. साईनाथ भोसले यांच्या श्री साई समर्थ हॉस्पिटलचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या हॉस्पिटल मध्ये जर महिलेला मुलगी झाली तर संपूर्ण वैद्यकीय सेवा मोफत दिल्या जातात.. ५९ व्या वर्षी महिलेने बाळाला जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *