महत्वाच्या घडामोडी

५६ वर्षाच्या सासूबाई जिममध्ये सूनेला देतायत तोडीस तोड टक्कर…

प्रतिनिधी / व्हायरल

आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणं ही काळाची गरज बनली आहे.. फिट राहण्यासाठी अनेकजण जिममध्येही जाताना आपण पाहत असतो.. पण असेही अनेक लोक आहेत की जे पन्नाशीनंतरही तरुणांना तोडीस तोड देताना आपल्याला दिसतात..

सध्या सोशल मिडीयावर असाच एका ५६ वर्षाच्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. ही ५६ वर्षीय महिला साडी नेसून आपल्या सुनेसोबत जिममध्ये वर्कआऊटला जाते.. त्या आपल्या सुनेसोबत रोज वर्कआऊट करतात..

जेव्हा मला गुडघेदुखी आणि पायांचं दुखणं असल्याचं समजलं तेव्हा मी वयाच्या ५२ व्या वर्षी पहिल्यांदा जिममध्ये गेल्याचं सासूबाई म्हणाल्या आहेत.. त्यांच्या मुलाने अनेक ठिकाणी उपचारासाठी नेले, परंतु सर्वांनी त्यांना वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला..

ही महिला रोज आपल्या सुनेसोबत जिममध्ये पुशअप्स आणि पॉवरलिफ्टिंगच नाही तर अन्य वर्कआऊटही करतात.. त्यामुळे त्यांचे पायाचे दुखणेही आता कमी झाले आहे.. या सासूबाईच्या वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *