महत्वाच्या घडामोडी

घरी जात असताना वीज काळ बनून आली.. पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. या गावातील एका व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.. बापू अर्जुळ नराळे ( वय – ३६ ) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे..

बापू नराळे हे त्यांच्या शेतात होते.. मुसळधार पाऊस सुरु झाल्याने बापू हे दुचाकीवरून आपल्या वस्तीवरील घराकडे जायला निघाले.. त्यावेळी वाटेतच त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागच्या जागीच कोसळले.. वीज अंगावर कोसळल्यामुळे बापू यांचा जागीच मृत्यू झाला होता..

बापू यांचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बापू यांचं शरीर हे काळ पडलं होतं.. बापू नराळे यांच्या मृत्यूची बातमी समजताच नराळे कुटुंबियांच्या मनावर मोठा आघात झाला आहे.. बापू नराळे यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *