महत्वाच्या घडामोडी

तीन वर्षीय चीमुकल्यासोबत घडलं असं काही.. पाहून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / झारखंड

झारखंडच्या गुमला जिल्ह्यातून दुर्गा पुजेसाठी बकऱ्याचा बळी देत असताना एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.. गुमला जिल्ह्यातील एका गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गापुजेत बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे..

या प्रथेप्रमाणे दोन बकऱ्यांचा बळी देण्यात आला होता.. मात्र तिसऱ्या बकऱ्याचा बळी देत असताना हत्याराचा तुकडा तुटला आणि जवळच उभे असलेले दीपक उरांव यांच्या ३ वर्षीय चिमुकल्यास लागला व तो गंभीर जखमी झाला.. त्यानंतर जखमी झालेल्या या मुलास रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे.. या चिमुकल्याच्या असं अचानक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *