महत्वाच्या घडामोडी

रक्षाबंधनला बहिणीला भेटायला जात असताना युवकावर काळाचा घाला !

प्रतिनिधी \जळगाव

पातोंडा येथे असलेल्या GAS एजन्सीजवळ १५ ऑगस्टला दुपारच्या सुमारास बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात रक्षाबंधनासाठी बहिणीला भेटायला जाताना टोळी (ता. पारोळा ) यथील तरुण मनोज युवराज पाटील ( वय – २६ ) याचा जागीच मृत्यू झाला. मनोज हा दोन बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ होता .मनोज कुटुंबातील कमावता होता

मनोज हा सावखेडा येथे आपल्या बहिणीला भेटायला जात असताना gas एजन्सीजवळ इगतपुरी आगाराची चोपडा- नाशिक बसने अमळनेरकडे जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात मनोजचा जागीच मृत्यू झाला. मनोजच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *