महत्वाच्या घडामोडी

बापरे ! ५० वर्षीय शिक्षकावर २० वर्षाच्या विद्यार्थीनीचं जडलं प्रेम..थेट मंदिरात जाऊन केलं लग्न…

प्रतिनिधी / बिहार

बिहारच्या समस्तीपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे.. येथे एक २० वर्षीय तरुणी एका इंग्लिश शिकवणाऱ्या ५० वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली आहे.. आणि त्या दोघांनी मंदिरात जाऊन लग्नही केले आहे..

संगीत ( वय – ५० ) आणि श्वेता कुमारी ( वय – २० ) अशी या दोघांची नावे आहेत.. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.. श्वेता ही समस्तीपूरच्या रोसडा येथे राहणारी विद्यार्थीनी इंग्लिश कोचिंगसाठी जात होती..

संगीत हे श्वेताला इंग्लिश शिकवत होते.. अभ्यास करता करता श्वेता ही संगीत या शिक्षकांच्या प्रेमात पडली.. आणि संगीत यांनादेखील श्वेता आवडू लागली होती.. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.. तशी शपथही दोघांनी घेतली..

संगीत यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.. त्यानंतर त्यांनी दुसर लग्न केलं नव्हत.. परंतु श्वेताच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.. आणि दोघांनी समस्तीपूर येथील एका मंदिरात जाऊन लग्न केले.. यावेळी काही जण उपस्थित होते.. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *