महत्वाच्या घडामोडी

शेतकऱ्याची मुलगी जिद्दीने झाली सर्वात तरुण पायलट…

प्रतिनिधी / सुरत

सुरतमध्ये राहणारी मैत्री पटेल ( वय – १९ ) ही पायलट म्हणून अमेरिकेहून परतली आहे.. शेतकरी कुटुंबातील या मुलीने अवघ्या वयाच्या १९ वर्षी पायलट बनून इतिहास रचला आहे.. या मुलीच्या यशामागे तिच्या वडिलांचा संघर्ष आहे.. आपल्या एकुलत्या एक मुलीला पायलट बनवण्यासाठी या शेतकरी पित्याने आपली जमीन विकून मुलीचे स्वप्न साकार केले आहे.. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पायलट बनून मैत्री पटेल ही देशातील सर्वात तरुण पायलट बनली आहे..

१२ वीत शिकून पायलट होण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या मैत्री पटेल हिने अवघ्या ११ महिन्यात आपले प्रशिक्षण पूर्ण करून व्यावसायिक पायलटचा परवाना मिळवला आहे.. मैत्री पटेल म्हणते की, जेव्हा ती ८ वर्षांची होती तेव्हा तिचे स्वप्न होते पायलट बनण्याचे.. आणि आता ते स्वप्न तिने अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केले आहे.. पुढे ती म्हणते की आता तिला कॅप्टन बनायचे आहे आणि स्वतःची वेगळी ओळख बनवायची आहे.. मुलीचे पायलट व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैत्रीचे वडील कांतिभाई पटेल आणि आई रेखा पटेल यांनी आपली शेती विकली होती, परंतु मुलीनेही जिद्दीने यशस्वी होऊन अवघ्या १९ व्या वर्षी पायलट बनून आपल्या आई – वडिलांचे नाव उज्वल केले आहे.. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *