महत्वाच्या घडामोडी

सतरा वर्षीय मुलीने आपल्या रुममध्ये संपवले जीवन…

प्रतिनिधी / उल्हासनगर

उल्हासनगर येथे कॅम्प क्रमांक पाच मध्ये राहणाऱ्या श्रुती सिद्धार्थ मोहोळ (वय – १७ ) या मुलीने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातले सगळेजण कामावर गेलेले असताना श्रुतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

श्रुतीच्या घरी आई – वडील आणि तिची बहिण असे चौघे जण राहतात. उल्हासनगर मधील कॅम्प क्र. पाच मध्ये राहणाऱ्या कैलास नगर येथे दुपारी श्रुतीची बहिण जेवायला घरी आली असता नेहमीप्रमाणे तिने घराचा दरवाजा वाजवला. परंतु, घरात असणाऱ्या श्रुतीने दरवाना उघडला नाही. त्यामुळे घाबरून लहान बहिणीने लगेच आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले.

शेजारच्या लोकांच्या मदतीने दरवाजा तोडून श्रुतीची बहिण घरात घुसताच तिला समोर श्रुतीने ओढणीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं दिसलं. यामुळे तिला मोठा धक्का बसला. यानंतर श्रुतीला तत्काळ खाली उतरवण्यात आले आणि तिला जवळच्या बालाजी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं..

यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुगालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास हिल लाईन पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *