महत्वाच्या घडामोडी

१६ वर्षाच्या मुलाने घरीच बनवली इलेक्ट्रिक बाईक, पाहा काय आहेत फीचर्स…

प्रतिनिधी / बिहार

बिहारमधल्या भागलपूर येथील एका १६ वर्षाच्या मुलाने आपल्या राहत्या घरीच एक इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.. ते म्हणतात ना, वयाला कर्तुत्वाची मर्यादा नसते आणि कलागुणांना तर नाहीच नाही.. ही गोष्ट या मुलाने खरी करून दाखवली आहे.. राजाराम असे या मुलाचे नाव आहे.. राजाराम या १६ वर्षाच्या मुलाने कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता आणि कोणत्याही तज्ञांची मदत न घेता घरच्या घरीच ही इलेक्ट्रिक मोटरसायकल बनवली आहे.. या इलेक्ट्रिक बाईकमधील battery पूर्ण चार्ज झाल्यावर ही बाईक १५० किलोमीटर पर्यंतची रेंज देते.. ही battery अवघ्या दोन तासात चार्ज होते..

राजारामच्या कर्तुत्वाने तो सध्या सर्वत्र चर्चेत आहे.. त्याने बनवलेल्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये एकापेक्षा एक फीचर्स दिले आहेत.. ज्यांचा तुम्ही विचार देखील करणार नाही.. या इलेक्ट्रिक बाईकची एक खास गोष्ट म्हणजे ही बाईक रायडरने हेल्मेट घातलं नसेल तर सुरु होत नाही आणि रायडर नशेत असला तरीसुद्धा ही बाईक सुरु होत नाही.. असं म्हटलं जातंय की, राजारामने सेन्सर्सद्वारे हे फीचर्स बाईकमध्ये जोडले आहेत.. या फीचर्समुळे रायडर अधिक सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील..

राजारामने बनवलेल्या या इलेक्ट्रिक बाईक पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ दोन युनिट वीज वापरली जाते.. आणि अवघ्या १५ रुपयांमध्ये तुम्ही १५० किमी. पर्यंतचा प्रवास करू शकता.. अशा या राजारामने बनवलेल्या इलेक्ट्रिक बाईकची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *