महत्वाच्या घडामोडी

झोक्यावर बसून करत होता अभ्यास ! अचानक घडलं असं काही…

प्रतिनिधी / अमळनेर

अमळनेर शहरातील मुंदडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे.. येथे एका मुलाचा झोका खेळताना अचानक गळफास लागून जागीच मृत्यू झाला आहे.. वेदांत संदीप पाटील ( वय – १४ ) असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे..

वेदांत याचे आई – वडील दोघेही शिक्षक आहेत.. वेदांत घरी वरच्या मजल्यावर झोक्यावर बसून अभ्यास करत होता.. अभ्यास करताना अचानक झोक्याच्या दोरीचा गळफास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे..

वेदांत हा मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये नववीचा विद्यार्थी आहे.. वेदांत हा काही महिन्यांपूर्वी कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जी.प. शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा मुलगा होता..

वेदांतच्या अशा अकस्मात मृत्यूने त्याच्या आई – वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. ही घटना समजताच वेदांतच्या आई – वडिलांनी हंबरडा फोडला.. त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *