महत्वाच्या घडामोडी

दुचाकीवरून जात असताना चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

प्रतिनिधी / परभणी

जिंतूर तालुक्यातील येलदरी रोडवरील केहाळ फाट्यावर काल सायंकाळी एक दुर्दैवी अपघात झाला आहे.. या अपघातात एका १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

माणकेश्वर येथील रहिवासी असलेले तिघेजण दुचाकीवर येलदरी येथे कामावर जात असताना केहाळ फाट्यावर एका अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली.. या अपघातामध्ये दुचाकीवर असलेल्या विठ्ठल पापनकर या १३ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर नागनाथ चव्हाण आणि लहान मुलगा गोपाळ जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.. या अपघाताची माहिती मिळताच जिंतूर ग्रामीण रुग्णालयात तिघांनाही दाखल करण्यात आले.. मात्र डॉक्टरांनी त्यातील १३ वर्षाच्या मुलाला मृत घोषित केलं आणि इतर दोघे गंभीर झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *