महत्वाच्या घडामोडी

चारशे फूट खड्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी जवानांनी केले शर्थीचे प्रयत्न.. अखेर घडलं असं काही…

प्रतिनिधी / नवी दिल्ली

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मंडावी या गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.. येथे एका बोअरवेलच्या खड्यात तन्मय ( वय – ०८ वर्ष ) हा खेळता खेळता अचानक पडला.. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले..

त्यानंतर तन्मयला वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.. बोअरवेलच्या समांतर अंतरावर १२ फूट लांब सुरंग लावून ४४ फूट खोल खड्डा खणण्यात आला.. त्यासाठी तब्बल ३ दिवसांहून अधिक कालावधी लागला..

एनडीआरएफचे जवान तब्बल ८४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयपर्यंत पोहोचले.. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. तन्मयची काहीच हालचाल होत नव्हती..

त्यानंतर तन्मयला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.. या घटनेने तन्मयच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *