सामाजिक

शेतकऱ्याचा मुलगा झाला सिए

आपली हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी गावखेड्यातील अनेक मुल रात्रंदिवस कष्ट घेताना दिसतात.. त्यात काही जणांना यश येत,तर काहीजण अपयशाने खचूनही जातात मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहील तर यशाला कोणीही रोखू शकत नाही. याच एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे.

बार्डी तालुका पंढरपूर येथील कृष्णा हणमंत माळी हा मुलगा नुकतीच सीए म्हणजेच बँकिंग क्षेत्रातली सर्वात मोठी चार्टड अकाऊंटट ही परीक्षा उतीर्ण झाला आहे. कृष्णाचे प्राथमिक शिक्षण बार्डी या त्याच्या राहत्या गावीच झाले, नंतर भोसे व करकंब येथून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तर महाविद्यालीन शिक्षण त्याने पुणे येथून पूर्ण केले.

बारावी नंतर पुण्यात पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने सीए ची पूर्व तयारीही सुरु केली होती. सीए होण्याच्या या प्रयत्नात कृष्णाला तीनवेळा अपयश आलं आहे. मात्र तो खचला नाही त्याच्या ध्येयापासून किंचितही दूर गेला नाही. अपयश आलं की काही दिवस गावाकडं राहणं , शेतात रमनं आणि पुन्हा जिद्दीन तयारीला लागणं ही त्याची सवय होती..

कृष्णाचे आई वडील शेतकरीच.. त्यांनी शेतात घाम गाळत कृष्णाच्या उज्वल भविष्याची स्वप्ने रंगविली.. नात्यांची ताटातूट सुरु असलेल्या काळात कृष्णा अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो.. त्यामुळे घरातील सगळेजण त्याच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत..

आपण मनापासून ठरवलं तर गावखेड्यात म्हशींच्या मागं धावणार पोरगं मोठ्या पदावर जाऊन बसू शकत , हे कृष्णानं दाखवून दिलंय.. नक्कीच त्याच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळेल.. त्याच्या पुढील वाटचालीसाठी एबी मराठी परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *