स्पेशल स्टोरीज

मिसळकट्टा ब्रंड ठरतोय महाराष्ट्राचा महाब्रंड

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती मोठी आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत.. वडापाव आणि मिसळ हे तर महाराष्ट्राच्या जिभेवर रेंगाळणारे पदार्थ.. बाजारात अनेक प्रकारच्या मिसळ आपण पाहत असतो आणि खातही असतो..

सध्या राज्यात अशाच एका मिसळची जोरात चर्चा आहे.. ‘ मिसळ कट्टा ’ या नावाने हा brand आता राज्याबरोबर देशात ओळखला जातो..

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील युवराज काळे या ध्येयवेड्या तरुणाने ९ फेब्रुवारी २०१७ मध्ये पुण्यात कर्वेनगर येथे मिसळकट्ट्याची सुरवात केली.. आणि पाहता पाहता हा कट्टा देशाबाहेरही चर्चेचा विषय झाला आहे..

युवराज काळे यांच्या घरात आजोबांपासूनच हॉटेलची पार्श्वभूमी होती.. युवराज यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सोलापूर येथून इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केलं.. आणि ते पुण्याला गेले.. पुण्यातच मोठ्या मोठ्या बिल्डींग पाहून आपण बिल्डर व्हावं अशी त्यांची इच्छा होती .. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले.. मात्र त्यासाठी लागणार भलमोठ भांडवल त्यांना  उभारता आलं नाही.. म्हणून त्यांनी ‘ मिसळकट्टा ’  सुरु करण्याचा निर्णय घेतला.. पुण्याच्या एका छोट्या जागेत सुरु झालेला त्यांचा हा व्यवसाय आता राज्य, आणि देशासोबत परदेशातही पसरला आहे..

याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *