राजकारण,निवडणूक

चित्रकलेमुळे महेशला मिळाला दुसरा डोळा

कला माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते..आजपर्यंत कलेमुळे अनेकांना पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार मिळालेले आपण अनेकवेळा पाहिले आहेत.. मात्र कलेमुळे कुणाला ‘ डोळा ’ मिळाल्याच उदाहरण आपण कधीच पाहिलं नसेल..

जामगाव, तालुका बार्शी येथील युवा चित्रकार महेश मस्के यांना आपल्या चित्रकलेमुळे एक डोळा मिळाला आहे..महेश हे लहानपणापासूनच एका डोळ्याने अंध आहेत.. एका डोळ्यावरच त्यांनी आजपर्यंत हजारो चित्रांचे रेखाटन केल आहे.. महेश पेन्सिल स्केच तर अप्रतिम काढतातच, मात्र पिंपळाच्या पानावर त्यांनी रेखाटलेली चित्रे सोशल मिडीयावर कायम चर्चेचा विषय ठरतात..

लहानपणी वडिलांसोबत गुरे राखायला गेलं की, गुरांच्या पायांचे चिखलात उमटलेले ठसे जशेच्या तसे शेजारीच चिखलात रेखाटायची सवय महेश यांना एव्हडा मोठा चित्रकार करेल असं कुणाला स्वप्नातही वाटल नसेल..

महेश यांनी आजपर्यंत अनेक कलाकार, अभिनेते, लोकप्रतिनिधी, लोकाभिमुख अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची पेन्सिल स्केच व पिंपळाच्या पानावरची चित्रे रेखाटली आहेत.. शरद पवार, अजित पवार, उदयनराजे भोसले, देवेंद्र फडणवीस यांसोबत अनेक नेत्यांना त्यांच्या चित्रांनी भुरळ पाडली आहे..

महेश यांना पिंपळाच्या पानावरील चित्रातून मोठी प्रसिद्धी मिळाली.. अनेकांनी त्यांची ही चित्रे पोस्ट करून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलंही.. मात्र अमेरिकेतल्या डॉक्टरांनी त्याची चित्रे पाहून महेशसाठी जे केलं ते इतर कोणालाही करता आलं नाही..

जन्मापासून एका डोळ्याने अधू असलेल्या महेशला अमेरिकन डॉक्टरांनी पुण्यात येऊन एक कृतीम डोळा दिला.. आता त्या डोळ्याने महेशला दिसत नसलं तरी त्याची दिसणारी कुरूपता कमी झाली आहे.. महेशचे दोन्ही डोळे आता सामान्य माणसासारखे सुंदर दिसतात..

अमेरिकन डॉक्टरांनी महेशच्या कलेकडे पाहून त्याला दिलेलं हे गिफ्ट तो सर्वोच मानतो.. डोळा बसवल्यानंतर महेशने जेव्हा पहिल्यांदा आरशात पाहिलं तेव्हा , तो धाय मोकलून रडला.. आजपर्यंत समाजाने त्याच्या डोळ्यांकडे पाहून केलेला त्याचा तिरस्कार , अवहेलना , आणि त्याचा न्यूनगंड एका क्षणात अश्रूंबरोबर वाहून गेला..

आपल्यावर विनामोबदला उपचार करणाऱ्या अमेरिकेतल्या डॉक्टरांना महेश आता आपला देव मानतो. डोळा बसवल्यावर महेशने त्या डॉक्टरांना पिंपळाच्या पानावर त्यांची नावे रेखाटून दिली..कला एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती परिवर्तन करू शकते, हे महेशच्या या घटनेन दाखवून दिलंय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *